आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष:राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांमुळे भेंडे ग्रामपंचायतीकडे लक्ष

कुकाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असुन दोंन्हीही गटांकडुन प्रतिज्ञापत्रकांतुन जाहिरनामा मतदारांसमोर मांडण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षांचाच ग्रामपंचायत निवडणुकीत मंडळ रिंगणात असल्याने राष्ट्रवादीची प्रतिष्ठा भेंडयांत पणाला लागली आहे. भैरवनाथ मंडळासाठी तरुणपिढी सरसावली असुन भैरवनाथ ग्रामविकास विरोधात ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळात सरळ लढत रंगली आहे. सरपंचपदासाठी तीन महिला उमेदवार रिंगणात तर सदस्यपदाच्या नऊ जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सदस्यपदाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर व भैवनाथ मंडळात सरळ लढती होणार आहेत. भेंडे खुर्दला २७९२ मतदार संख्या असुन सदस्य पदासाठी तीन प्रभाग आहेत. सरपंचपदासाठी भैरवनाथ ग्रामविकास मंडळाकडुन वर्षा वैभव नवले तर ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळाकडुन अलका बापुसाहेब नवले यांच्यातली लढत रंगणार असुन अपक्ष लताबाई बाळासाहेब चौधरी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढतीत रंगभरला आहे. तर सदस्य पदांसाठी सरळ दुरंगी लढती होणार आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी सवई हेच काम बघत आहेत.

भैरवनाथ मंडळाचे नेतत्व अभियंता बाळासाहेब नवले,कुमार नवले,सोपान महापुर व माजी सरपंच सुनिल खरात हे करत आहेत तर ज्ञानेश्वर मंडळाचे नेतत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले करत आहेत. ज्ञानेश्वर व ग्रामविकास मंडळात सरळ लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले यांचे भेंडे खर्द हे गाव असल्याने नेवासे तालुक्याचे लक्ष भेंडे खुर्द ग्रामपंचायतीकडे लागले आहे. भैरवनाथ मंडळाने राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना या ग्रामपंचायतीत आव्हान दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...