आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहकारी साखर कारखानदारीच्या स्थैर्यासाठी उसाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. यासाठी ऊस उत्पादकांसाठी अमृत कलश योजनेची सुरुवात करण्यात आली. सहकारातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी औजारे बँक सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातर्फे प्रवरानगर येथे आयोजित ऊस पिक परिसंवादात मंत्री विखे बोलत होते. ऊस तज्ञ कृषिरत्न डॉ. संजीव माने यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, नंदुशेठ राठी, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, सुधाकर बोराने आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादन वाढीसाठी अमृत कलश योजनेतून एकरी उस उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कारखाना आणि ऊस उत्पादकांनी एकत्र काम करावे. ऊसाचे उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर होण्याची गरज आहे.
शासनाने ठिंबकसाठी आता ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमध्ये यांत्रिकिकरणावर भर देत असतानाच ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासह कारखान्यामार्फत औजारे बँक सुरू करण्यात येईल. यातून तरुणांना रोजगार मिळेल. डॉ. संजीव माने यांनी ऊस पिकांसाठी जमीन, मशागत, लागवड तंत्र लागवड अंतर, बेणे निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय कर्ब वाढीसाठी सेंद्रीय खताचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात उपाध्यक्ष विश्वास कडू यांनी उत्पादनवाढीसाठी आयोजित विविध योजनांची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.