आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बनावट मद्य तयार करून विक्री करणाऱ्या बालाजी वाईन्स दुकानाला ठोकले टाळे, कायमस्वरूपी परवाना निलंबित करून व्यवस्थापकासह मालकावर गुन्हा दाखल करा

अकोले4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील मध्यवस्तीतील परवानाधारक बालाजी वाईन्स दुकानावर बनावट मद्य तयार करून विक्री करण्याच्या कारणांवरून कारवाई करीत अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी टाळे ठोकण्याचे आदेश दिले. यानुसार रविवारपासून हे दुकान बंद करण्यात आले. या कारवाईचे अकोल्यातून महिला, तरुण व सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. या गंभीर गुन्ह्यात फक्त ४ परप्रांतीय आरोपीस अटक केल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून व्यवस्थापकासह मालकावरही गुन्हे दाखल करून अटक करावी. जिल्हा प्रशासनाकडून या दुकानाचा परवाना यापुढे सुरू होणार नाही, यासाठी योग्य पाठपुरावा करून तो कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी जनतेतून होत आहे. अकोल्यात बालाजी वाईन्स या शासनमान्य परवानाधारक विदेशी दारू दुकानांवर ३० मार्च रोजी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून विविध नामांकित कंपन्यांची बनवट दारू बनवण्याच्या साहित्यासह ४ परप्रांतीय आरोपींना रंगेहाथ अटक केल्यानंतर अकोल्यातून संतापाची लाट निर्माण झाली. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. या विरोधात राष्ट्रवादी महिलांसह पदाधिकाऱ्यांनी अकोले तहसील कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. त्यानंतर रविवारपासून या दुकानाला प्रशासनाकडून टाळे ठोकण्यात आले. परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी केलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, राष्ट्रवादी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिलकुमार कोळपकर, नगरसेवक नवनाथ शेटे, आरिफ शेख, राजेंद्र मैड, गणेश तोरमल, संतोष नाईकवाडी, भागवत शेटे, बबन ताकांडे, ऊर्मिला राऊत, नीता आवारी, जग्गु मैड, उबेद शेख, मोहसीन शेख, मुश्ताक शेख, बाळासाहेब भांगरे, गंगाराम पापळ, निवृत्ती नाईकवाडी, अभिजित वाकचौरे, अप्पासाहेब थोरात, शांताराम देवकर यांनी बालाजी वाईन्स दुकानाला उशिरा का होईना टाळे ठोकल्याबद्दल जिल्हा व तालुका प्रशासनाचे आभार मानले.

अकोल्यातील विविध राजकीय कार्यकर्त्यांच्या मागणीला यश

उशिरा का होईना, पण कारवाई केली
बालाजी वाईन्समध्ये बनावट मद्य तयार करून विकतात. घातक रासायनिक पदार्थ पिऊन अनेकजण मृत्यू पावले, तर अनेकांना आतड्याचे आजार होऊन काही किडनी व कर्करोगाने त्रस्त आहेत. यापूर्वीही अनेकदा या दुकानावर कारवाई झाली. पण प्रशासनाकडून तडजोड घडवून पुन्हा हे दुकान सुरू होते. मात्र, आता या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करावा. याबाबत मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे निवेदन दिले. एवढे घडूनही हे दुकान खुलेआम सुरूच होते. उशिरा का होईना प्रशासनाने या दुकानास टाळे ठोकल्याबद्दल आभार. ''
अनिल कोळपकर, राष्ट्रवादी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष.

दुकान सुरू झाल्यास आंदोलन करणार
अकोले शहरात बालाजी वाईंन्स दारु दुकानदार बनावट दारू बनवताना रंगेहात पकडले. तरीदेखील त्याचे दुकान सुरू कसे राहते? एका पिढीचे आरोग्य धोक्यात घालून शेकडो युवकांचा जीव घेणाऱ्या दारुवाल्यावर बनावट मद्य बनवण्याचा गुन्हा दाखल करून हे दुकान कायमचे बंद झाले पाहिजे. ते रविवारपासून बंद करण्यात आले असले तरीदेखील पुन्हा सुरू झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.''
सुरेश नवले, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

बातम्या आणखी आहेत...