आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

कौठा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०२१-२२ परतीच्या पावसामुळे अक्षरशः वाया गेला. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, तुर व अन्य पिकाचे अतोनात नुकसान झाले अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून रितसर पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले तरीही शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आहे याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

सर्व महसूल मंडलात गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ ला परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिरावला गेला. यामुळे कपाशी सोयाबीन व तुर सह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले. अशा बाधित पिकाचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत ग्रामसेवक याच्यामार्फत करण्यात आले. तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळणे आवश्यक होते.

पण दोन महिने संपूनही मदत मिळालेली नाही. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या पंचनामे पुन्हा दुरुस्तीसाठी पंचनामापत्रावर संबंधित शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर याची माहिती भरुन देण्याचे, तसेच अतिवृष्टीची माहिती इंग्रजीतून सरकारला हवी असल्याचे समजते. त्यामुळे प्रशासन पुन्हा कामाला लागले आहेत.नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिकनिहाय क्षेत्र हेक्टरमध्ये याप्रमाणे : कपाशी - २४९०६ हेक्टर, सोयाबीन - १०२५३, तुर -३११४, बाजरी - ८७७.

बातम्या आणखी आहेत...