आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचवेळी भेटी देऊन प्रस्ताव देणाऱ्या शिक्षकांची पडताळणी:जिल्ह्यात १४ शिक्षकांसह २ केंद्रप्रमुखांना पुरस्कार जाहीर

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी ३९ शिक्षक व ४ केंद्रप्रमुखांचे प्रस्ताव दाखल झाले होते, या प्रस्तावांची जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचे तालुके बदलून पडताळणी केली. पडताळणीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या १४ शिक्षकांसह २ केंद्रप्रमुखांना पुरस्कार जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी जाहीर केले.दाखल प्रस्तावांपैकी ३ शिक्षक व एका केंद्रप्रमुखाने पुरस्कारासाठी नकार दिला होता. जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या पथकाने एकाचवेळी भेटी देऊन प्रस्ताव देणाऱ्या शिक्षकांची पडताळणी केली.

या पथकांनी शिक्षकांना प्रश्नावलीतील मुद्देनिहाय १०० पैकी गुण दिले. तसेच २५ गुणांची लेखी परीक्षाही गेतली. अशा १२५ पैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संतोष सदगीर (आंबड शाळा), अशोक शेटे (खांडगाव), सुदाम साळुंके (गिरमेवस्ती) भिमराज शेळके (पिंपरी लोकाई) तरन्नुम खान (बेलापूर उर्दू), विद्या उदावंत (दिघेवस्ती घानोरा) सुमन तिजोरे (वडाळा बहिरोबा), सविता बुधवंत (गुंफा), अण्णासाहेब साळुंके (जिरेवाडी) अनिता पवार (लटकेवस्ती) नवनाथ दिवटे (माळवदेवस्ती) भावना मोहिते (इंरिगेशन कॉलनी मढेवडगाव) ज्योती साबळे (पवारवाडी सुपा) शरद धलपे (काळामळा) यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाळासाहेब दळवी (चास) व भाऊसाहेब गायकवाड (वांबोरी) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...