आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:निवृत्त शिक्षक कचरदास‎‎ सारडा यांना पुरस्कार‎

शेवगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर‎ येथील फिरस्ता संघाच्या वतीने‎ आयोजित “सन्मान मान्यवरांचा” या‎ उपक्रमांतर्गत गणित व शास्र‎ विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक‎ कचरदास सारडा यांना सन्मानित‎ करण्यात आले. शहरातील वरुर‎ आणि आखेगाव रस्त्यावर दररोज‎ मार्निंग वाॅकसाठी जाणाऱ्या‎ नागरिकांनी एकत्र येत सामाजिक‎ कार्यकर्ते राधेश्याम तिवारी यांच्या‎ संकल्पनेतून फिरस्ता संघाची‎ स्थापना केली.

संघा मार्फत विविध‎ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या‎ मान्यवरांना सन्मानित केले जाते.‎ त्याअनुषंगाने सिध्द समाधी योगच्या‎ प्रशिक्षका डाॅ. मेधा कांबळे यांच्या‎ अध्यक्षतेखाली तसेच शेवगाव‎ फिटनेस क्लबच्या संचालिका‎ जबीन शेख व रेश्मा शेख आदींच्या‎ उपस्थितीत प्रा. सारडा यांचा सन्मान‎ करण्यात आला. काकासाहेब‎ लबडे, विष्णू बडे यांनी प्रा. सारडा‎ यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी‎ सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर काळे,‎ गोरक्षनाथ बडे, प्रा. रमेश‎ पोरवाल,सचिन लड्डा यांच्यासह‎ सर्वश्री देवराव दारकुंडे, अनिल‎ रासने, नवनाथ कवडे, अकील‎ शेख, विजयकुमार बलदवा, अरुण‎ कुलकर्णी, सत्यविजय शेळके,‎ सुभाष कुलकर्णी, रामदयाळ‎ लाहोटी, रावसाहेब कांबळे,‎ राधेश्याम सारडा आदी सहभागी‎ झाले होते. सूत्रसंचालन जनार्दन‎ लातूरकर यांनी केले. विठ्ठल भापकर‎ यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...