आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकी:सर्वाधिक आरोपी गजाआड करणाऱ्या सहा ठाण्यांना पुरस्कार

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते गौरव

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी, तसेच विशेष मोहिमेंतर्गत सर्वाधिक आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सहा पोलिस ठाण्यांना पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पोलिस अधीक्षक कार्यालयात गुन्हे आढावा बैठक पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

पाहिजे असलेले व फरार असे सर्वाधिक आरोपी अटक केल्याप्रकरणी श्रीगोंदे, नेवासे, तोफखाना, राजूर, नगर तालुका, अकोले या पोलिस ठाण्यांना उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देण्यात आला. अनेक वर्षे पसार आरोपीचा विशेष मोहिमेत शोध घेऊन जिल्ह्यात ११८३ आरोपीचा शोध लावला होता. संगमनेर शहर पोलिस ठाण्याने ६ गुन्हे उघड केला. घरफोडीचे ४ गुन्हे उघड केला. श्रीगोंदे ठाण्याने ईश्वर भोसले टोळीवर कारवाई केल्याप्रकरणी, संगमनेर तालुका पोलिसांनी २४ तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याप्रकरणी, कोपरगाव तालुका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा उघड केल्याप्रकरणी, अकोले पोलिसांनी ७ आरोपी अटक केल्याप्रकरणी, नेवासे पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघड केल्याप्रकरणी, तोफखाना पोलिसांनी सात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड आणल्याप्रकरणी, कोतवाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत याच आरोपींकडून इतर सहा गुन्हे उघडकीस आणल्याप्रकरणी या सर्व पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.

गुन्हे शाखेच्या कामगिरीचा सन्मान
स्थानिक गुन्हे शाखेने सुरुवातीस ४ गावठी कट्टे व १२ काडतुसे जप्त केली. तर चेन स्नॅचिंगचे सात गुन्हे उघडकीस आणले. पाथर्डी तालुक्यातील ११ वर्षे जुना खुनाचा गुन्हा उघड केला. मागील महिन्यात ६ गावठी कट्टे व १२ काडतुसे जप्त केली. घरफोडीचे १७ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

उपअधीक्षक मिटके, जाधव यांचाही सत्कार
कुख्यात सागर भांड व आकाश डाके टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत तपास करुन दोषारोप पत्र दाखल केल्याप्रकरणी उपअधीक्षक संदीप मिटके यांचा, तसेच उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पारनेर तालुक्यातील भोसले टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत तपास करुन दोषारोपपत्र दाखल केल्याप्रकरणी या दोघांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...