आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्तीने युवा पिढी सक्षम:विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण; व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता यावर जनजागृती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालय पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमातंर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता व स्त्रीभ्रुण हत्या या विषयावर जनजागृती केली. कवी बाळासाहेब अमृते व्याख्यानात म्हणाले, पर्यावरणावर शाश्‍वत विकास अवलंबून आहे. तर व्यसनमुक्तीने युवा पिढी सक्षम होणार आहे.

राष्ट्रीय एकात्मतेने भारत विकासाकडे झपाट्याने वाटचाल करु शकतो. सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवक ताण-तणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवक दिसत असून, त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे. स्त्रीभ्रुणहत्या हा गंभीर प्रश्न समाजासमोर आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...