आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएड्स प्रतिबंध हाच उपाय असल्याने, या संसर्गाची बाधा टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, तसेच संसर्गीत व्यक्तीबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ ते ३ मार्च व ८ ते १० मार्च दरम्यान कला पथकांमार्फत बसस्थानकात जनजागृती करण्यात येणार आहे. पारंपरिक कलांतून प्रबोधन करण्याचा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. कुलस्वामिनी कला मंच व जय हिंद कलापथकांच्या वतीने नगर, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, जामखेड येथील बसस्थानक, तसेच गर्दीच्या ठिकाणी कलापथकाद्वारे एड्सबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांचा सहभाग व सहकार्य घेतले जाणार आहे.
ज्या भागात जागृती करायची आहे, त्या भागातील आयसीटीसी केंद्राचे समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या समन्वयातून कार्यक्रम राबवणार आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर जनजागृतीपर विविध उपक्रम राबवले जातात. त्यात एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यासाठी समुपदेशन, जनजागृती रॅली महाविद्यालयात व्याख्याने, पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जनजागृती व्हिडिओ बनवणे, जिंगल स्पर्धा आदी उपक्रम राबवले आहेत. युवा वर्ग, सर्वसाधारण जनता, महिला, दुर्लक्षित गट, अतिजोखमीचे गट आदी भागात जनजागृती करून एचआयव्ही तपासणीसाठी प्रोत्साहित केले जाते.
जिल्ह्यात १० हजार ५६७ बाधितांवर उपचार
जिल्ह्यात नियमीत एचआयव्ही संसर्गाच्या निदानासाठी शासकीय यंत्रणांकडून चाचण्या केल्या जातात. जिल्ह्यात सद्यस्थितीत सुमारे १० हजार ५६७ व्यक्ती एड्ससह जीवन जगत आहेत. या बाधीतांवर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.