आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:किटकजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाची जनजागृती, आरोग्य विभागाने आवाहन केले आहे

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर जनजागृती होण्यासाठी पत्रिका, डांसोत्पती स्थाने, कंटेनर सव्हेक्षण आदी प्रतिबंध उपाय घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी उपाययोजना राबवत काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा हिवताप कार्यालय व लायन्स क्लब ऑफ नगर यांच्यातर्फे आरोग्य विभागामार्फत दरवर्षी एप्रिलमध्ये हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर उपाय योजना राबवल्या जातात. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवक, पर्यवेक्षक यांनी शहरात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालय व शहरातील पाण्याच्या हौदात गप्पीमासे सोडली जात आहेत. आजाराच्या नियंत्रणासाठी ठिकठिकाणी उपाय योजनेचे पत्रके वाटली जात आहे. नागरिकांनी या डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी उघड्या पाण्याच्या टाक्या, हौद व पाणीसाठे झाकून ठेवा. कुलर, फ्रिज, फुलदाणी यातील पाणी ३ दिवसांनी बदला. जुने टायर, नारळाच्या करवंट्या टाकाऊ वस्तू नष्ट करा. सेप्टिक टँकच्या व्हेटपाईपला जाळी बसवा. पाण्याचे साठवण हौद, भांडी घासून पुसून स्वच्छ व कोरडी ठेवा. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळा. किटकजन्य आजारावर योग्यवेळी उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात रक्त तपासणी करा. घाबरून न जाता शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घेऊप मोहिमेला सहकार्य करा, असे आवाहन नाशिक विभागाचे सहायक सहसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पर्यवेक्षक तुकाराम माळी, विनायक वाडेकर, आरोग्य सेवक मनेश सांगळे, नितीन नेवासकर, गणेश कोटकर यांनी केले आहे.

डास उत्पत्तीस्थाने व लक्षणे
संथ वाहणारे पाणी, पाण्याचे डबके, पाण्याच्या टाक्या व साठे, टायर, सेप्टी टँक, तुंबलेली गटारे, वापरात नसलेली विहीर आदी डासांची उत्पत्ती स्थाने आहेत. हिवताप आजार अ‍ॅनाफिलीस डासाच्या चाव्यामुळे होतो. हा डास रात्री चावतो. यामुळे थंडी, ताप, घाम येणे, डोके-अंग दुखी, मळमळ, उलटी आदी लक्षणे जाणवतात. डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजार आहेत. हा डास दिवसा चावतो. ताप, सांधे-पोटदुखी, अंगावर पुरळ येणे, उलट्या आदी लक्षणे या आजाराची आहेत.

बातम्या आणखी आहेत...