आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:बेलपिंपळगाव येथील तरुण कार्यकर्त्यांची वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती; वटवृक्षाच्या सावलीत वाढदिवस केला साजरा

सोनईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवस म्हटले की मोठ मोठे केक,डीजे च्या आवाजावर थिरकणारी तरुणाई, खानावळी असे चित्र सर्रास पाहण्यास मिळते. परंतु नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील तरुणाई यास अपवाद आहेत. बेलपिंपळगाव येथील मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळ व प्रशांत गडाख मित्रमंडळातर्फे दररोज गावातील तरुणांचे सामाजिक भान जपत वाढदिवस साजरे केले जातात व गावाच्या एकोप्यासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी काम केले जाते.

सात वर्षांपूर्वी वसंतराव कांगुणे ग्राम पंचायत सदस्य बेलपिंपळगाव यांच्या वाढदिवसानिमित्त भर उन्हात वटवृक्षांचे वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा करण्यात आला होता. फक्त वृक्षरोपण करूनच कांगुणे थांबले नाही तर त्या वृक्षांकडे लक्ष देत त्यांनी संगोपनही केले. त्या वटवृक्षाची आज बेलपिंपळगाव येथे डेरेदार सावली निर्माण झाली आहे.

याच वटवृक्षाच्या सावलीत कांगुणे यांचा मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवस साजरा करत त्यांच्या वृक्षप्रेमाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बेलपिंपळगाव येथील कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच चंद्रशेखर गटकळ ,पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, उपसरपंच बाबासाहेब भांड, तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, अमोल कोकणे, चंद्रकांत सरोदे, राजेंद्र साठे, कृष्णा शिंदे, बंडूपंत चौगुले, किशोर गारोळे, पोलिस पाटील संजय साठे, सोपान औटी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...