आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक बांधिलकी:बाफना उद्योग समूह राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने सन्मानित

जामखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड शयेथील बाफना उद्योग समुहास राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. सिनेकलावंत तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते व्यवस्थापक संचालक आकाश दिलीप बाफना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या राज्यस्तरीय पुरस्काराने बाफना उद्योग समूहाची महाराष्ट्र पातळीवर नोंद झाली आहे. राज्यातील ४२ उत्पादक कंपनीला महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी सहा उत्पादक कंपनी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.

जामखेड येथील बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने तीन वर्षात सामाजिक बांधिलकी जपत शंभरापेक्षा आधिक कामगारांना आपल्या उद्योग समुहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कोरोना संकटाच्या काळातही कंपनीची यशस्वी वाटचाल चांगली राहिली आहे. जिल्हा उद्योग केंद्राने याची दखल घेऊन बाफना ग्रुप ऑफ़ इंडस्ट्रीज मधील बाफना पॉलिमर इंडिया ही कंपनी पुरस्कारास पात्र ठरली आहे.महाराष्ट्र उद्योग पुरस्कार हा पुणे येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने बाफना उद्योग समुहास सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते व माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या उपस्थितीत बाफना उद्योग समुहाचे व्यवस्थापक संचालक आकाश बाफना यांना महाराष्ट्र उद्योग भूषण २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ४२ उत्पादक कंपन्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या मध्ये अहमदनगर जिल्हातील ६ कंपन्यांचा समावेश होता.

हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर बाफना उद्योग समुहाचे व्यवस्थापक संचालक आकाश बाफना म्हणाले, मिळालेला पुरस्कार हा आमच्या संपूर्ण बाफना समुहास व काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे श्रेय आहे. समुहा मध्ये काम करताना एक परिवार म्हणून कंपनीची सर्व टीम एकदिलाने काम करते. पुरस्कार मिळाला असल्याने ही कौतुकाची थाप आमच्यावर पडली आहे.

या पुढे अशाच पद्धतीने वाटचाल करत बाफना उद्योग समुह नवीन नवीन क्षेत्रात पाऊल ठेवेल. बाफना उद्योग समुहाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आहे तसेच लवकरच महाराष्ट्राबाहेर देखील चांगल्या गुणवत्तेचे प्रोडॉक्ट पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश बाफना यांनी यावेळी दिली.या पुरस्काराबद्दल बाफना समुहाचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...