आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीन:बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूरला जामीन

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंगार मधील आर्मी स्टेशन हेडक्वार्टरच्या बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.सैन्य दलातील स्टेशन हेडक्वार्टर अंतर्गत बांधकामासाठी आवश्यक एनओसीचे काही बनावट कार्यालयीन पत्रव्यवहार सही शिक्यासह केल्याचे निदर्शनास आले व त्याबाबतचा गुन्हा नोंदवण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या सांगण्यावरुन कोतवाली पोलिस स्टेशनला राजेंद्र देसराज सिंग उर्फ राजा ठाकूर व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी राजा ठाकूर व इतरांना अटक करुन नगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले.या आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अ‍ॅड. महेश तवले, अ‍ॅड. संजय दुशिंग यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला. वकिलांनी युक्तिवाद करुन आरोपीची बाजू मांडली व न्यायालयास निदर्शनास आणून दिले की, राजा ठाकूर यांच्याकडून पोलिसांना पुरावा प्राप्त झाला नाही व गुन्ह्यात वापरलेले एनओसी, रबर स्टॅम्प याची देखील यांच्याकडून जप्ती झालेली नाही, त्यामुळे गुन्ह्यात लागू केलेली कलमे ही यांना लागू होत नाहीत, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी राजा ठाकूर यांना जामीन दिला.

बातम्या आणखी आहेत...