आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीराव दराडे म्हणाले:शिंदे गटाचे एक हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जाणार

अकोले11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्व शिवगर्जना अभियानांतर्गत शिंदे शिवसेना गटाचा उत्तर नगर जिल्ह्यातील पहिला भव्य मेळावा खा. सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात लवकरच होणार आहे. अकोले तालुक्यातून एकनाथ शिंदे गटाचे एक हजार सच्चे शिवसैनिक मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत, असा विश्वास व्यक्त करुन उत्तर जिल्हाप्रमुख खेवरे यांचे वक्तव्य लोकशाहीला न शोभणारे आहे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे म्हणाले.

अकोलेतील दराडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसैनिक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस संजय वाकचौरे, सुरेश भिसे, सुदाम नवले, बाळासाहेब मालुंजकर, संपत पवार, साहेबराव दातखिळे, अनिल गायकवाड उपस्थित होते.

दराडे म्हणाले, २१ सप्टेंबर रोजी मंत्री शंभूराजे देसाई व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर येथे हिंदू शिवगर्जना अभियान मेळावा झाला. या मेळाव्यासाठी अकोलेतून १५० च्या जवळपास शिवसैनिक उपस्थित होते. हा मेळावा संपल्यावर शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख खेवरे यांनी खासदार लोखंडे यांनी विना पोलिस बंदोबस्तात उत्तर नगर जिल्ह्यात मेळावा घेऊन दाखवावा, असे आव्हान दिले. त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. तालुक्यात होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असा दावा त्यांनी केला. आपण शिंदे गटाचे आहेत का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दराडे म्हणाले, ज्यावेळी शिंदे हे गुवाहाटीला गेले व त्यांना खासदार लोखंडे यांनी साथ दिली त्यावेळी खासदार लोखंडे यांना मी पहिला फोन करून आपण योग्य निर्णय घेल्याचे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...