आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरातील रामवाडी परिसरात बजरंग दलाचे शहर प्रमुख कुणाल भंडारी यांच्यावर झालेला प्राण घातक हल्ला, जिल्ह्यात विविध ठिकाणी गोरक्षकावर होणारे हल्ले तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत सोमवारी पाथर्डी येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढत पाथर्डी पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात दिले.
यावेळी विहिंपचे देविदास पवार, दत्तात्रय दारकुंडे, मनोज गांधी, सनी दिनकर, राजू हराळे, रमेश बोरुडे, आदिनाथ लगड, आशुतोष शर्मा, चैतन्य पवार, उद्धव केदार, पांडुरंग शिंदे, सोमनाथ बंग, पंकज राठी, नानासाहेब पालवे, कार्तिक वाघमारे, महेश बाहेती, अक्षय टेकाळे, वेदांत थोरात, ऋषिकेश शिंदे, कार्तिक कराड, प्रवीण आव्हाड, निलेश इजारे, भारत आंधळे, सारंग मंत्री, मंगेश वाघ, सुरेश पाटसकर, विनोद वाघ, रवींद्र गायकवाड, शिवनाथ घाटूळ आदी सहभागी झाले होते. शहरातील स्वर्गीय वसंतराव नाईक चौकातून निषेधाच्या घोषणा देत हा निषेध मोर्चा पाथर्डी पोलिस स्टेशनवर गेला. पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे, उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुप्तवार्ता विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप यांनी आंदोलकांशी चर्चा करत निवेदन स्वीकारले. योग्य ती कारवाई करू असे आश्वासन मोर्चेकरांना दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.