आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर:महिनाभरानंतरही बाळ बाेठे पाेलिसांना सापडेना, 'स्टँडिंग वाॅरंट’ अर्जावर आज होणार सुनावणी

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्येतील मुख्य सूत्रधार बाळ बाेठे फरार हाेऊन ३१ दिवस उलटले. अद्याप ताे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. शेवगाव येथील हरवणे हत्याकांड, काेळपेवाडी दराेडा व खून, केडगाव व जामखेडचे दुहेरी हत्याकांड, उद्याेजक हुंडेकरी अपहरण अशा राज्यभर गाजलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आराेपींना अटक करणाऱ्या पाेलिसांना बाेठे का सापडत नाही, असा सवाल नगरकरांना पडला आहे. दरम्यान, बाेठेला फरार घाेषित करावे (स्टँडिंग वाॅरंट) अशी मागणी पाेलिसांनी न्यायालयाकडे केली असून त्यावर साेमवारी सुनावणी आहे.

जरे यांची ३० नाेव्हेंबरला नगर-पुणे महामागावरील जातेगाव घाटात हत्या झाली. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन दिवसांत पाच आराेपींना अटक केली. मुख्य सूत्रधार बाेठे मात्र पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. बाेठे याची शहरातील एका बड्या हाॅस्पिटलमध्ये माेठी भागीदारी असल्याची चर्चा आहे. नगरसह पुणे व अन्य शहरांत त्याच्या अनेक मालमत्ता आहेत. ४५ छापे टाकूनही तो पोलिसांना सापडत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser