आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कारवाई:रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास हैदराबाद येथून अटक; साडेतीन महिन्यांपासून होता फरार

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद येथून आणले जात असताना मुख्य आरोपी बाळ बोठे - Divya Marathi
हैदराबाद येथून आणले जात असताना मुख्य आरोपी बाळ बोठे
  • हैदराबादेत अहमदनगर पोलिसांची शनिवारी पहाटे कारवाई

सामाजिक कायकत्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख फरार आरोपी बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी अटक केली. हैद्राबाद येथून त्याला अटक केली. बोठे हा वेळोवेळी वेशांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पाच दिवस चाललेल्या पोलिसांच्या मिशन हैद्राबाद कारवाइला शनिवारी सकाळी साडेसहा वाजता यश मिळाले.

बोठेसह त्याला मदत करणाऱ्या आणखी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली.बोठे हा हैद्राबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे सहा पथके मागील पाच दिवसांपासून हैद्राबाद येथे तळ ठोकून होते. पाच दिवस शोध घेऊनही बोठे सापडत नव्हता. अखेर बिलालनगर भागातील एका हॉटेलमध्ये बोठे असल्याची माहिती मिळाली. ज्या हॉटेलमध्ये बोठे लपला होता. त्यास बाहेरून कुलूप होते.

हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठातील अॅड. जनार्दन चंद्राप्पा याने बोठेस आश्रय दिला होता. नगरमधील महेश वसंतराव तनपुरे हा बोठेच्या संपर्कात होता.

यापूर्वी दोन ते तीन वेळा पोलिसाना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी झाला होता. मात्र यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुबंई पोलिस व हैदराबाद पोलिसांच्या मदतीने नगर पोलिसांनी बोठेला अटक केली. जर्नादनअकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैदराबाद, तेलंगणा), पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ( रा. हैदराबाद, तेलंगणा) ( फरार), राजशेखर अंजय चाकाली ( रा. मुस्ताबाद, तेलंगणा), शेख इस्माईल शेख अली ( रा. रंगारेड्डी, तेलंगणा), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (रा. रंगारेड्डी, तेलंगणा) अशी इतर आरोपींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...