आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता, सारे आहारावरच अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त होणे हे आहाराच्याच आधीन आहेत. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील. आणि कितीही औषधे घेतली, पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग होणार नाही, म्हणून आरोग्यदायी जीवनासाठी आहार आणि व्यायाम यातील तारतम्य आवश्यक अाहे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली किरण यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयात सुरू असणार्या नारी शक्ति सप्ताहात स्त्रीरोगतज्ञ डॉ. वैशाली किरण आणि मानसोपचारतज्ञ डॉ. अपूर्वा काळे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी डॉ. किरण बोलत होत्या. डाॅ. किरण यांनी व्यायाम आणि आहार यांतील तारतम्य, आचरणातील शिस्तबध्दपणा, स्त्रियांचा मासिक धर्म, गर्भाशयाचे आरोग्य आदींविषयी मार्गदर्शन केले. मानसोपारतज्ञ डॉ. काळे यांनी स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्प्यावरील मानसिकतेवर भाष्य केले. तसेच, स्त्रियांच्या मानसीक आरोग्याचे संवर्धन कसे करावे, तरुणपणात होणारे मानसीक बदल, आणि पाल्य आणि पालक यातील मनमोकळा संवाद ई. बाबी समजावून सांगितल्या. सूत्रसंचालान डॉ. शबनम गुरुंग यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.