आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:भेंडे संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गव्हाणे तर संदीप फुलारी यांची उपाध्यक्षपदी निवड

कुकाणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडे बुद्रुक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब गव्हाणे व उपाध्यक्षपदी संदीप फुलारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आर. एन. जहागिरदार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक शिंदे आण्णासाहेब शिंदे,राजेंद्र फुलारी, बबनराव तागड, किसन यादव, जगन्नाथ साबळे, रविंद्र गव्हाणे, केशव गव्हाणे, संतोष मिसाळ, रमेश गोर्ड, शिलाबाई देविदास गव्हाणे, साखरबाई मच्छिंद्र मिसाळ उपस्थित होते. ही निवड बिनविरोध होण्यासाठी लक्ष्मणराव शिंदे, कडूभाऊ काळे, तुकाराम मिसाळ, दत्तात्रय काळे, डॉ. शिवाजी शिंदे, शिवाजी तागड,अशोकराव मिसाळ,गणेश गव्हाणे, नामदेव निकम आदींनी प्रयत्न केले. मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...