आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विखे गटाला धक्का:बाळासाहेब हराळांसह आणखी एक झेडपी सदस्य राष्ट्रवादीच्या मार्गावर - जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतील विखे गटाचे दोन मातब्बर सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. याला अधिकृत दुजोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ व आणखी एका मातब्बर सदस्याचा उल्लेख करत दुसऱ्या सदस्याचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे दुसरा सदस्य कोण ? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे.

राष्ट्रवादीचा स्थापना दिन

राष्ट्रवादी काँग्रेसचा 23 वा स्थापना दिन राष्ट्रवादी भवनात साजरा करून मविआतील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फाळके बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे, संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, गणेश गव्हाणे, अंबादास गारूडकर, किसन लोटके, गजानन भांडवलकर आदी उपस्थित होते.

मुंबईत पक्ष प्रवेश

फाळके म्हणाले, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील दोन मातब्बर सदस्य पुढील गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. नगर तालुक्यातील बाळासाहेब हराळ व आणखी एका सदस्याचा समावेश आहे. दुसऱ्या सदस्याचे नाव आम्ही सध्यातरी गोपनीय ठेवले आहे. तसेच पुढील कालावधीत बरीच राजकीय उलथापालथ होईल. पुढे फाळके यांनी ही नावे विखे गट व भाजपशी संबंधित असल्याचे फाळके यांनी स्पष्ट केले.

शिंदे नंतर निवडून येणार नाहीत...

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषद उमेदवारीतून भाजपने ताकद दिल्याबाबत विचारले असता, राजेंद्र फाळके म्हणाले, ते पुन्हा २०२४ मध्ये निवडून येऊ शकणार नाही म्हणूनच त्यांना भाजपने विधानपरिषदेत संधी दिली. ते पालकमंत्री असताना आम्ही त्यांना पाडले असल्याचेही फाळके म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...