आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत:बाळासाहेब नाहाटा : स्वत:भोवती वलय निर्माण करणार नाव

लोणी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत सदस्य ते राज्यमंत्री दर्जा असलेल्या राज्यपातळी वरील महासंघाचे सभापतिपदापर्यंतचा प्रविणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटा यांचा प्रवास हा सुखद,दुःखद,खडतर आणि तितकाच चमत्काराने भरलेला आहे. राजकारण आणि समाजकारण याची सांगड बसली. पैसे कमवताना मिळेल त्यातील त्यातील काही रक्कम गरिबांना देण्याची वृत्ती मुळे ते तालुक्यात प्रकाशझोतात आले. नाहाटा आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. सा खर सम्राट आणि प्रस्थापित नेतेमंडळीच्या श्रीगोंदे तालुक्यात अल्पसंख्याक समाजातील व साखर कारखान्याशी दुरान्वये संबध नसलेलं पण दातृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर गेली १८ वर्षे राजकारणात समाजकारणात स्वतः भोवती वलय निर्माण करणार नाव म्हणजे प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा. बाळासाहेब नाहाटा हे राज्यातील ३१२ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्र असलेल्या राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापती आहेत.

एरवी राजकारणी म्हणजे लोकांना देताना आपल्याला काही ठेवायचे हा राजकारणातील अलिखित नियम पण नाहाटा त्याला अपवाद ठरले. आपल्या कमाईतील लोकांना द्यायचे हा “नाहटा पॅटर्न” नाहाटा यांनी आणला आणि त्याच काळात डबघाईकडे वाटचाल करणाऱ्या श्रीगोंदे बाजार समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली आणि त्यांनी या बाजार समितीच्या आतुन बाहेरून सुधारणा केली. राजकारण बाजूला ठेवले मानधन नाकारले, श्रीगोंद्यात जवळपास कुठेच भुईकाटा नसल्याने बाजार समितीच्या आवारात भुईकाटा उभारला,येथील लिंबू देशातच काय परदेशात प्रसिद्ध. पण बाजार समितीच्या आवारात गाळे नव्हते ते बांधले. त्यामुळे येथे सायंकाळी लिंबू खरेदी विक्रीची सोय झाली,श्रीगोंदे बाजार समिती राज्यात नावारूपाला आली पुढच्या निवडणुकीत तर सर्व नेत्यांनी बिनविरोध साठी प्रयत्न करून पुन्हा सभापतिपदासाठी नाहाटा यांना संधी दिली.

दरम्यानच्या काळात नाहाटा यांनी पेडगाव पंचायत समिती गण मध्ये स्वखर्चाने रस्ते,वीज खांब,मंदिर जीर्णोद्धार, शाळा बांधकाम,रोहित्रे बसविणे यातून येथील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. नाहाटा यांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. गरीब मल्लांना खुराक,गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच सायकल मदत,रुग्णांना उपचारासाठी खर्च,स्वतः च्या लोणी गावातील मागासवर्गीय समाजातील २ जणांना दरवर्षी घरकुल बांधणे, विंधन विहीर आदी लोकोपयोगी कामातून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि २०१७ मध्ये पेडगाव गणातून नाहाटा यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह झाला. विशेष म्हणजे त्यांचे लोणी गाव बेलवंडी गणात मोडते. पण कामामुळे दुसऱ्या गणातून आग्रह झाला. कागदपत्रे जमवतानाच मांडवगण जिल्हा परिषद गटातील भानगाव गणात उभे राहण्याची इच्छा नाहाटा यांनी व्यक्त केली. या भागात विकासाचा अनुशेष होता भानगाव गणातील मतदारांनी इच्छापूर्ती केली. नाहाता पॅटर्न या लोकांना माहिती होता. या गणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या वाडी, वस्तीवर, स्वखर्चाने बोअरवेल दिले. मंदिरावर विजेची सोय केली रस्ते,पाणीपुरवठा योजना मार्गी लावली.

दरम्यान काळात आमदार पाचपुते यांच्याशी मतभेद झाल्याने पाचपुते गटाला सोडचिठ्ठी देत नागवडे,जगताप गटाला साथ दिली पुढे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून रासपचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले.

दानशुरता आणि सामाजिक बांधिलकी पदातून न्याय देण्याची वृत्ती यामुळें राज्य बाजार समिती निवडणुकीत नाहाटा यांनी ओळखीतून नाशिक झोन मधून अर्ज भरला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्याचवेळी नाहाटा यांना मोठी जबाबदारी देण्याचे ठरवून संचालकपदी बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न केले. आणि नाहाटा संचालक झाले. अजित दादांनी ठरवलं होत सभापतिपद देऊ तर नाहाटा यांनाच. त्यामुळे जिल्ह्यात विरोध सुरू असताना आणि दिग्गज मंडळी आपल्या समर्थकांसाठी लॉबिंग करत असताना नाहाटा यांचे पुत्र लोणी व्यंकनाथ चे उपसरपंच मिथेश नाहाटा यांनी सर्व सोपस्कार पूर्ण करत अजित पवार यांच्याशी संपर्कात राहून राज्यपातळीवरील सभापती पदावर नाहाटा विराजमान झाले. राज्य बाजार समिती सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकोट्यात होते विशेष म्हणजे नाहाटा सभापती होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नव्हते परंतु अजित दादांची शिफारस !

निवड झाल्यावर नाहाटा यांनी २ मागण्या केल्या. कुकडी-घोड पुरेसे पाणी मिळावे आणि राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी मदत, तर २ वचन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा विजय त्यातील एक वचन पक्षप्रवेश रूपाने पूर्ण होत आह, तर दुसरे वचन पूर्ण करण्यासाठी नाहाटा काय जुगाड करतात ते पाहण्याची उत्सुकता आहे दुसरे वचनही पूर्ण करतील कारण नाहाटा पॅटर्न राजकीय जुगाडाचा बादशहा आहे! -अंकुश शिंदे, श्रीगांेदे

बातम्या आणखी आहेत...