आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोहेगाव परिसरात महाविद्यालयाची सोय नसल्याने अनेक मुले व मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. सहकारमहर्षी कै. गणपतराव रंभाजी औताडे पाटील सामाजिक व शैक्षणिक मंडळाने पोहेगाव येथे हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केल्याने उच्च शिक्षणाची गळती रोखली जाईल, असा विश्वास महाविद्यालयाचे संस्थापक नितीन औताडे यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाच्या वतीने वेस सोयगाव येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात औताडे बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीलाल जावळे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच जया माळी, उपसरपंच आनंदा भडांगे, माजी सरपंच अशोक म्हाळसकर, सुरेश पाडेकर, सिकंदर इनामदार, मंगेश खंडीझोड, प्रकाश सरवार, भाऊ रहाणे, रामनाथ कोल्हे, गणीभाई इनामदार, दत्तात्रेय गोसावी, सोमनाथ खंडीझोड, दीपक कोल्हे, नारायण खंडीझोड, भास्कर खंडीझोड आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वेस सोयगाव येथे ५ ते ११ जानेवारीपर्यंत विशेष श्रमसंस्कार शिबिर होणार आहे. यात ग्रामसंस्कृती व पर्यावरण संरक्षण संवर्धन, ग्रामीण युवक व रोजगार, ग्रामीण युवकांपुढील आव्हाने, आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
शिबिरात स्वच्छ व स्वस्थ भारत, वृक्षारोपण व संवर्धन, जल संवर्धन व जल व्यवस्थापन, श्रम संस्कार, आरोग्य जनजागृती, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता, नवमतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम, शिवारभेट, सामाजिक प्रबोधन व पथनाट्य आदी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शांतीलाल जावळे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.