आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब थोरात यांची टीका:धर्माचे, जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे असा सोपा उपाय काहीजणांनी शोधला, हे लोकशाहीला मान्य नाही

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार आहे. सध्या अहमदनगर शहरातील वातावरण काळजी वाटावे असे आहे. यात आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. काहीजणांनी सोपा उपाय शोधला आहे. धर्माचे किंवा जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे. समाजात भेद निर्माण करणे व दहशत निर्माण करणे ही पद्धत चुकीची असून हे लोकशाहीला मान्य नाही, अशी टीका माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी रात्री (7 मार्च) ला अहमदनगर येथे केली.

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत थोरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आमदार लहू कानडे,अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

समाजाची सेवा हेच किरण काळेंकडे भांडवल

बाळासाहेब थोरात म्हणाले, अहमदनगर शहर हे काँग्रेस विचारांचे आहे.काँग्रेसचा विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. अहमदनगर शहरातील सध्याचे वातावरण काळजी वाटावे असे आहे. यात आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंकडे दादागिरी, पैसे नाहीत. मात्र विनम्रपणे समाजाची सेवा करणे हेच त्यांच भांडवल आहे.

काही लोक ठेकेदारी करू पाहताहेत - किरण काळे

किरण काळे म्हणाले, जय श्रीराम म्हणताना आमची छाती गर्वाने फुलून येते. मात्र काही लोक आता या नावाने ठेकेदारी करत करू पाहत आहेत. असा आरोप त्यांनी केला.यावेळी दशरथ शिंदे, प्रवीण गीते, निजाम जहागीरदार, ॲड.अजित वाडेकर, ॲड. अक्षय कुलट, अरुण म्हस्के, अजय मिसाळ, नाथा अल्हाट, अभिनय गायकवाड, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, आदी यावेळी उपस्थित होते.

कसबा मतदारसंघातील उमेदवार जो आहे तो खरा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांचे स्वतःचे श्रेय हे खूप आहे. या यशामागे तो प्रत्येकाच्या घरी जाणे येणे, बसणे असा वर्षानुवर्ष करत होता‌. त्याला याचे श्रेय बरोबर लोकांनी त्याच्या पदरात टाकले आहे.

महाविकास आघाडी म्हणून जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व बरोबर एकत्र जीवाने लढले आणि इथून पुढेही लढणार आहेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...