आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यजित जिंकले, पण खूप राजकारण झाले:त्यामुळे मी व्यथित; आपल्याला पार भाजपपर्यंत नेऊन पोहचवले! - बाळासाहेब थोरात

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मधल्या काळात आणखी एक राजकारण झाले. विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झाले. सत्यजित खूप चांगल्या मतांनी निवडून आला. त्याचे अभिनंदन पण जे राजकारण झाले ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तूस्थिती आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या. पक्षाच्या राजकारणाविषयी बाहेर बोलावे हा माझा स्वभाव नाही. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करू असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी आज केले.

संगमनेर येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी जनतेला उद्देशून बाळासाहेब थोरात आज बोलत होते.

माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या

बाळासाहेब थोरात म्हणाले, मी माझ्या भावना काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर बोलू नये या मताचा मी कायम आहे. त्यामुळे त्या बाबतीत जे काही आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करू.

पार भाजपपर्यंत आपल्याला नेऊन पोहचवले

आपण काही काळजी करू नका. काॅंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात अशा काही बातम्या आल्या की, आपल्याला पार भाजपपर्यंत नेऊन पोहचवले. भाजपच्या तिकीटाचे वाटपही त्यांनी करुन टाकल्या. काही लोकांनी गैरसमज पसरवला. ते कशा पद्धतीने गैरसमज करतात हे पाहीले अनेक चर्चाही त्यांनी घडवून आणल्या.

काॅंग्रेस हा आपला विचार

बाळासाहेब थोरात म्हणाले, काॅंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. त्या विचाराने आतापर्यंत वाटलाच आपण केली व पुढेही याच विचाराने आपली वाटचाल राहील याची ग्वाही आपण देऊया. आजचा आनंदाचा दिवस आहे. पण माझ्या मनातील भावना मी बोलल्या. येथून पुढच्या काळात जनतेने माझ्या पाठीशी आशिर्वाद द्यावा.

यापूर्वी असे कधी घडले नाही

बाळासाहेब थोरात म्हणाले, मी गत महिना लोकांमध्ये नव्हतो. संगमनेर तालुक्यातील लोकांपासून मी दुरावलो, असे यापूर्वी कधी घडले नाही. महाराष्ट्रातील सर्वात चांगले, विकसित तालुके अहमदनगर जिल्ह्यात आहेत.

कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय

बाळासाहेब थोरात म्हणाले, सत्ताबदलानंतर आपल्या तालुक्यावर सूड उगवावा असे प्रयत्न होत आहेत. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. हा अनुभव आपल्याला आला आहे. प्रत्येक गोष्टीतून आपण यश मिळवले आहे. आणखी यश मिळवू, नव्या उमेदीने उभे राहू.

बातम्या आणखी आहेत...