आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको आंदोलन:पोलिस निरीक्षकाच्या विरोधात बंदची हाक

कुकाणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे पोलिस ठाण्याच्या वादग्रस्त पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुकाण्यात व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने १ सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने गावबंदचे आवाहन करण्यात आले. मनसेच्या जिल्हा सचिवांनी, तर ग्रृहमंत्री फडणवीस यांच्या सराकारी निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले.

पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या कार्यपद्धतीने व्यापारी वर्गात असुरक्षितपणाची भावना असून व्यापारी वर्गावर दहशत पसरवण्यामागे निरीक्षकाचे पाठबळ असल्याचे म्हटले. कुकाणे व परिसरातील दरोडे, चोऱ्या, अवैध धंदे यामुळे जनतेला उपद्रव सोसावा लागत असल्याने कुकाण्याची बाजारपेठ वाचवण्यासाठी आंदोलनात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले. जाणता राजा संघटनेने पोलिस निरीक्षकांच्या मोबाइल सीडीआर चौकशी केल्यास सत्य उजेडात येईल, अशी मागणी करीत १ सप्टेंबरला गावबंदची हाक दिली. मनसेचे जिल्हा सचिव विलासराव देशमुख यांनीही पोलिस निरीक्षकांच्या विरोधात मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर येत्या मंगळवारी ३० ऑगस्टला घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...