आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर मर्चंटस् बँकेचेही तब्बल ५० वर्षांची वाटचाल कौतुकास्पद आहे. बँकेचे संस्थापक हस्तीमल मुनोत यांची सहकारी बँकिंगमध्ये ५४ वर्षांपासून योगदान देत आहेत. सहकाराची तत्व व मूल्य याचा मेळ घालून सहकाराचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त व निबंंधक अनिल कवडे यांनी केले.
अहमदनगर मर्चंटस् बँकेची दाळमंडई शाखा स्वमालकीच्या वास्तूत प्रशस्त करण्यात आली. त्याचे उद्घाटन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक चेअरमन तथा विद्यमान संचालक हस्तीमल मुनोत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा. माणिक विधाते, निखिल वारे, विनित पाउलबुधे, महेंद्र गंधे, सचिन जाधव, किरण काळे, अंबिका महिला बँकेच्या मेधाताई काळे, वैभव देशमुख, कॉन्ट्रॅक्टर सुनील गुगळे, विराज भंडारे, संजय मुनोत, विवेक आपटे, अशोक गुगळे, बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक किशोर गांधी, सीएआयपी अजय मुथा, अनिल पोखरणा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, सीए मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, संजय चोपडा, अमित मुथा, संजीव गांधी, मीनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, विजय कोथिंबीरे, सुभाष भांड, सेवक प्रतिनिधी संदीप लोढा व अनंत होशिंग, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य अॅड. शरद पल्लोड, नरेंद्र लोहाडे, राजेश झंवर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी आदी उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सकाळी दाळमंडई शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आमदार संग्राम जगताप, हस्तीमल मुनोत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात चेअरमन आनंदराम मुनोत यांनी केले. संचालक संजीव गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. व्हाईस चेअरमन सुभाष बायड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.