आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्या हातांनी साकारला बाप्पा:समर्थ प्रशालेत पर्यावरणपुरक गणपती बनवा कार्यशाळा, 101 विद्यार्थ्यांचा सहभाग

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडी येथील श्रीसमर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक विभागाच्या वतीने गत 14 वर्षांपासून सुरू असलेली पर्यावरण पूरक गणपती बनवा कार्यशाळेची परंपरा याही वर्षी कायम राखली. इयत्ता सातवी व आठवीच्या 101 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. सावेडी येथील समर्थ विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी नेहमी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत नेहमी विविध सण, उत्सवही साजरे करण्यात येत असतात. श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक अशा मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, या हेतूने समर्थ विद्यामंदिर प्रशालेत शाडूच्या मातीपासून गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणपती बनवा कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

पर्यावरण रक्षणास हातभार

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका संगीता जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्तीची स्थापन का करावी, यामुळे पर्यावरण रक्षणासाठी कसा हातभार मिळतो, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनंतर कलाशिक्षक विवेक भारताल यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनवून दाखवताना गणपतीचे पाट, तसेच शरीराचे विविध भाग कसे बनवावे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. आवश्यक त्या ठिकाणी फलकावर रेखाटने करून दाखवले.

विविध रुपात बाप्पा

यावेळी विद्यार्थ्यांना गणपती बनवताना प्रत्येकाच्या जवळ जाऊन बारकावे सांगितले. विद्यार्थ्यांनी शेषनाग गणेश, जयमल्हार गणेश, आसनस्थ गणेश, श्रीकृष्ण रूपातील बाल गणेश अशा विविध प्रकारचे गणपती बनवले. विविध रूपातील गणपती बनवताना उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.

यांची मेहनत

श्रीसमर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. किशोर देशपांडे, मुख्याध्यापिका संगीता जोशी, पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के या सर्वांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाडूच्या मातीपासून गणपती बनवा कार्यशाळेसाठी प्रशालेतील कलाशिक्षक विवेक भारताल, शिक्षक अमोल बागूल यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...