आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:बारागाव नांदूर पाणी योजनेला मोठ्या‎ व्यासाच्या पाइपलाइनची आवश्यकता‎

राजेंद्र वाडेकर | राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारागाव नांदूर व इतर १४ गावे प्रादेशिक‎ पाणी पुरवठा योजनेला नवीन मोठ्या‎ व्यासाची पाइपलाइन तसेच भराव टाकून‎ पिचिंग दुरुस्तीचा प्रश्न उन्हाळ्यापूर्वी‎ मार्गी न लागल्यास भविष्यता‎ लाभक्षेत्रातील गावकऱ्यांना पाण्याच्या‎ निर्जळीचा सामना करण्याची वेळ येणार‎ आहे. नदीपात्रातून पूर्व दिशेला गेलेल्या‎ पाइपलाइनची वारंवार तुटफूट होत‎ असल्याने काही भागात नवीन मोठ्या‎ व्यासाची पाइपलाइन टाकणे तसेच भराव‎ टाकून पिचिंगचे काम झाल्यास भविष्यता‎ उद्भवणारा पाणी टंचाईच्या प्रश्न‎ टळण्यास मदत होणार आहे.

‎ राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर व‎ इतर १४ गावे पाणी पुरवठा योजना मुळा‎ धरणा तून थेट पाइपलाइनद्वारे पाणी‎ आणले आहे. बारागाव नांदूर, डिग्रस,‎ राहुरी खुर्द, तमनर आखाडा, देसवंडी,‎ कोंढवड, शिलेगाव, केंदळ खुर्द, केंदळ‎ बुद्रूक, पिंप्री चंडकापूर, वळण, मानोरी,‎ मांजरी, आरडगाव या लाभक्षेत्रातील‎ गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.‎ स्वर्गीय शिवाजीराजे गाडे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली उभी राहिलेल्या‎ बारागाव नांदूर पाणी योजनेला गेल्या‎ काही वर्षांपासून तुटफुटीला सामोरे जावे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लागत आहे.

२०१६ साली मुळा‎ नदीपात्रातील पाइपलाइन फुटून‎ लाभक्षेत्रातील पाणी पुरवठा खंडित झाला‎ होता. या पाठोपाठ सप्टेंबर २०२२ मध्ये‎ राहुरी खुर्द हद्दीतील मुळा नदीपात्रातील‎ पाइपलाइन फुटल्याने तब्बल ६ दिवस‎ पाण्याचा पुरवठा बंद राहिला.मुळा‎ नदीपात्रातील वाळूचा अमर्याद‎ उपसाबरोबरच मुळा धरणातुन सोडण्यात‎ आलेले हजारो क्युसेक पाण्याचा तडाखा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बसल्याने भरावाची तूटफूट होऊन‎ पाइपलाइन वाहून गेली.

या योजनेचे‎ समन्वयक शौकत इनामदार यांनी‎ आधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने वाहून‎ गेलेले पाइप पुन्हा जमा करून दुरुस्तीचे‎ काम मार्गी लावल्याने सातव्या दिवशी‎ बारागाव नांदूर व इतर १४ गावातील‎ पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला. मुळा‎ धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नदीपात्रात‎ सोडल्या जाणाऱ्या हजारो क्युसेक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाण्याने नदीपात्राचा दोन्ही थडीचा भाग‎ कापला गेल्याने मुळा नदीचा मूळ प्रवाह‎ बदलला आहे. धरणा तून नदीपात्रात‎ सोडण्यात येणाऱ्या पाण्याची देखील‎ वाहून जाण्याची सुरक्षित सोय होणे‎ आवश्यक आहे. जलजीवन मिशन‎ कार्यक्रमांतर्गत बारागाव नांदूर व १४ गावे‎ योजनेच्या नवीन पाइपलाइन व कामाचा‎ प्रश्न मार्गी लागल्यास भविष्यातील संकट‎ टळण्यास मदत होणार आहे.‎

पाणीपट्टी वसुलीत उदासिनता‎
मुळा धरणावर अवलंबून असलेल्या‎ इतर ८ प्रादेशिक पाणी योजनेत बारागाव‎ नांदूर पाणी पुरवठा योजना सरस ठरली.‎ या योजनेवर २८ सदस्यांची नियुक्ती‎ असून यामध्ये १४ सरपंच आहेत. मात्र‎ दोन वर्षांपासून पाणीपट्टी वसुलीलस गाव‎ पुढाऱ्यांची उदासिनता नडल्याने‎ योजनेच्या वाटचालीला अडथळा‎ निर्माण झाला. योजनेच्या वीजबिलापोटी‎ जिल्हा परिषदेकडून येणारे ५० टक्के‎ अनुदान तसेच देखभाल दुरुस्तीचे पैसे ४‎ वर्षांपासून मिळाले नाहीत. नोव्हेंबर २०२२‎ मध्ये ९२ लाख रुपये वीजबीलाचा भरणा‎ न झाल्याने महावितरणकडून‎ वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित‎ होण्याची वेळ आली होती.‎

बातम्या आणखी आहेत...