आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:सबजेल कारागृहात महिला कैद्यांसाठी बराक उपलब्ध नाही; महिला आरोपींना येरवड्यात ठेवण्याची वेळ

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कारागृहात महिला कैद्यांना ठेवण्यासाठी बराक उपलब्ध नसल्याने त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. पर्यायाने एखाद्या गुन्ह्यात महिला आरोपी अटक केली आणि तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यास तिला येरवडा कारागृहात ठेवण्यात येते. यामुळे पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्हा कारागृहाची इमारत खूप जुनी आहे. महिला कैद्यांना ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या बराकीचे छत कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. महिला आरोपी ठेवण्यासाठी सध्या बराक उपलब्ध नाही. जी बराक होती तिची पडझड झाली असल्याने तिच्यात महिला आरोपी ठेवण्यात येत नाही, असे कारागृह अधीक्षक पेत्रस गायकवाड यांनी सांगितले.

नगर शहर पोलिसांनी एखाद्या गुन्ह्यात अटक केलेल्या महिला आरोपीला त्या गुन्ह्यात जामीन मिळाला नाही व तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यास तिला जिल्हा कारागृहात न ठेवता पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवले जाते. तिला घेऊन जाणे, न्यायालयासमोर हजर करणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात. यामध्ये प्रशासनाचा खर्च, वेळ वाया जातो.

बातम्या आणखी आहेत...