आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:भेंडे खुर्द ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरु

कुकाणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील भेंडे खुर्द ग्रामपंचायती ची निवडणुक डिसेंबर महिन्यात होणार असल्याने या निवडणुकीसाठी आतापासुनच रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायतीत एकूण तीन प्रभाग आहेत. ९ सदस्य संख्या आहे, तर २७९२ मतदार संख्या आहे. ९ पैकी ५ जागा महिलांकरीता राखीव आहेत.

सर्वसाधारण ६ जागांपैकी ४ तर नागरिकांच्या मागासप्रवर्गातील १ जागा अशा पाच जागा महिला राखीव आहेत. या निवडणुकीसाठी येत्या १५ डिसेंबरला मतदान हाेणार आहे. दोन गटात सरळ लढत अपेक्षित आहे. अभियंता बाळासाहेब नवले यांची भूमिका या ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीकडे परिसराचे लक्ष लागले आहे. सरपंच सुनील खरात यांच्या कार्यकाळातही विकासाची कामे झालेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...