आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकलन:जिल्ह्यातील दहा नगरपालिकांची रणधुमाळी सुरू; आजपासून होणार प्रभाग रचनांवरील हरकतींचे संकलन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे १० मार्च २०२२ ला थांबवलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता त्याचदिवसापासून सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवारपासून (१०मे) या पालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नसल्याने राज्यातील स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्चन्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्यभरातीलनगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० ते १४ मेदरम्यान प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांद्वारे २३ मे पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगास ३० मे पर्यंत अहवाल पाठवला जाणार आहे. व ६ जूनला अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली जाणार आहे.त्यानंतर प्रभागांच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया निवडणूक आयोगाच्यानिर्देशानुसार होणार आहे.

जिल्ह्यात नऊ पालिका व १ नगरपंचायतीची निवडणूक
नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड,शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी व देवळाली प्रवरा या ९ नगरपालिका व नेवासे नगरपंचायत अशा १० स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांचे संकलन मंगळवारपासून सुरू होणार आहे. या आधी जिल्ह्यातील पारनेर, अकोले व कर्जत या नगरपंचायतींच्या निवडणुका दोन महिन्यांपूर्वीच झाल्या आहेत व श्रीगोंदे नगरपालिकेची मुदत संपण्यास अजून पावणे दोन वर्षे बाकी आहेत. दरम्यान, जिल्हापरिषद व पंचायत समित्यांची नवी प्रारुप गट व गण रचना अहवाल राज्य निवडणूक आयोगास पाठवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...