आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आनंदी जीवनासाठी द्वेष व क्लेषमुक्त व्हा ; तारकॠषिजी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनात द्वेष व क्लेष असला की जीवन अस्थिर बनते. आनंदी जीवनासाठी द्वेष व क्लेषमुक्त झाले पाहिजे. क्षमापना हे जैन धर्मातील आत्मशुध्दीचे पर्व आहे. दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाकडून अनवधानाने अथवा जाणीवपूर्वक चुका होतात. राग लोभाचे परिमार्जन करणे व त्यासाठी क्षमा मागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. एखाद्याला क्षमा करणे तसेच मनापासून क्षमा मागणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. नम्रता व क्षमाशीलता प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावी हीच क्षमापना पर्वाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन तारकॠषिजी महाराज यांनी केले.

जैन धर्मियांच्या पवित्र पर्यूषण महापर्वामधील सामुदायिक क्षमापना कार्यक्रम आनंदधामच्या प्रांगणात झाला. क्षमा वीरस्य भूषणम्‌ या उक्तीला अनुसरुन उपस्थित प्रत्येकाने कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल हात जोडून एकमेकांची क्षमा मागितली. ‘खमाव खमाव’च्या गजरात आनंदधामचे पवित्र प्रांगण दुमदुमले होते. जैन साध्वीजींच्या सान्निध्यात हजारो भाविकांनी क्षमापना कार्यक्रमात सहभाग घेत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.चातुर्मासानिमित्त आचार्यश्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आनंदधाममध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

सामूहिक क्षमापना कार्यक्रमावेळी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी, नवकार साधक, उपप्रवर्तक, श्रमण संघीय सलाहकार तारकॠषीजी आदि ठाणा ५, व्याख्यानी उदयप्रभाजी आदी ठाणा, आलोकऋषीजी, पद्मऋषीजी, सत्यप्रभाजी, करूणाप्रभाजी, डॉ.पूज्य सुयोगऋषीजी, श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, सीए रमेश फिरोदिया, जैन समाजाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, श्रावक संघाचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, बाबूशेठ लोढा, सेक्रेटरी संतोष बोथरा, संतोष गांधी, नितीन कटारिया उपस्थित होते.हस्तीमल मुनोत म्हणाले, आचार्यश्रींच्या पावन भूमीत होत असलेला चातुर्मास व पर्युषण पर्व प्रत्येकालाच आत्मउन्नतीचा मार्ग दाखवत आहे.

बातम्या आणखी आहेत...