आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता सतर्क रहा : जिल्हाधिकारी भोसले

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या.

राज्यातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पूर्व तयारीसाठी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन बैठक झाली. त्यावेळी डॉ.भोसले यांनी अधिका-यांना सूचना दिल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित उपस्थित होते.

दररोज ७०० कोरोना चाचण्या करा
जिल्‍हाधिकारी भोसले म्हणाले, राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. आज जरी नगर जिल्ह्याची हाताच्या बोटावर मोजण्याऐवढी रूग्ण संख्या असली तरी ही रूग्णसंख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा प्रशासनाने सतर्क होत, संभाव्य वाढत्यास कोरोना रूग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी वेळेत उपाययोजना कराव्यात. दररोज किमान ७०० कोरोना तपासण्या करण्यात याव्यात. यातील ६० टक्के आरटीपीसीआर व ४० टक्के रॅपिड अँटीजेन तपासण्या कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी भाेसले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...