आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृध्दी कॉम्प्लेक्स मधील युनिव्हर्सल स्पोर्टच्या दुकानांसमोरील कॉलमला दुकानाच्या जाहीरातीचे बॅनर दुकानदार व त्याचा मित्र चिटकावीत असताना सहा जणांच्या टोळक्याने येथे बॅनर लावायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा प्रयत्नान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सुरज अशोक निमोणकर यांचे जामखेड पंचायत समिती समोरील समृध्दी कॉम्प्लेक्समध्ये १७ नंबर गाळ्यात युनिव्हर्सल स्पोर्टचे दुकान आहे. या दुकानांसमोरील कॉलमवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकान चालक सुरज निमोणकर व त्याचा मित्र विकास कचरू साळुंके हे स्पोर्टच्या जाहिरात चिटकावीत होता. सुरज हा कटर आणण्यासाठी दुसर्या दुकानात गेला असता त्यावेळेस कैलास विलास माने तेथे आला व त्याने कचरू साळुंके यास घाण घाण शिवीगाळ करून येथे बॅनर चिटकावयाचे नाही, असे म्हणून कोणाला तरी फोन केला व थोड्याच वेळात एका मोटारसायकलवरून तुषार हनुमंत पवार, बबलु जाधव व राहूल माने (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी आले. व त्यांनी कैलास माने यांना विचारले कोण आहे तेव्हा ते दोघे आहेत त्यांना जिवे मारूण टाका जिवंत सोडू नका असे म्हणताच बबलु जाधव याने विकास साळुंके व राहूल माने याने छातीवर लाथ मारली, तर तुषार हनुमंत पवार याने विकास यास जिवे मारण्याच्या उद्देशाने विकास यास तीन वेळा उचलून जमीनीवरील ब्लॉकवर आदळले. बबलु जाधव याने सुरज यास जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन वेळा उचलून आपटले पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारू असे म्हणून निघून गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.