आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:महिलेला मारहाण करून विनयभंग

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पती कामाला गेल्यानंतर घरी असलेल्या पत्नीला तिघांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार पती घरी आल्यानंतर त्यांना सांगितला असता त्या तिघांनी पतीलाही मारहाण केल्याची घटना उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब आहेर, तुकाराम गाडेकर व प्रसाद पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. फिर्यादीचे पती कामाला गेले होते. गुरूवारी रात्री त्या व त्यांचा लहान मुलगा घरी होता. त्यावेळी भाऊसाहेब, तुकाराम आणि प्रसाद फिर्यादी यांच्या घरी आले व म्हणाले, ‘पाण्याचा पाईप द्या, तो आपला सामाईक पाईप आहे’. फिर्यादी यांनी पाईप देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तिघांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. भांडणामध्ये फिर्यादी यांचे एक तोळ्याचे मिनी गंठण गहाळ झाले आहे. फिर्यादीचे पती घरी आल्यानंतर त्यांना झालेला प्रकार सांगितला. ते आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...