आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:कुटुंबीयांना मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकामासाठी दिलेली खडी परत मागितल्याचा राग आल्याने डोंगरगण (ता. नगर) येथील एका कुटुंबाला दांडक्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी तुकाराम किसन काळे (वय ४५, रा. डोंगरगण) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय बाबासाहेब आढाव, सोनु संजय आढाव, गौरव संजय आढाव, बहिरू रामभाऊ दारकुंडे, नवनाथ रामभाऊ दारकुंडे, शोभा बहिरू दारकुंडे (सर्व रा. डोंगरगण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तुकाराम काळे यांनी आढाव यांना बांधकामासाठी त्यांच्याकडील खडी दिली होती. त्यांनी ती खडी परत मागितली होती. आढाव यांना याचा राग आल्याने त्यांनी नातेवाईकांना बोलून घेत फिर्यादी यांचा मुलगा, पत्नी, मुलगी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...