आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये बसप नगरसेवकावर गुन्हा:पैशाची मागणी करत पत्नीचा छळ केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरी नांदत असलेल्या विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी करणाऱ्या नगरसेवक पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक पती अक्षय सदानंद उणवणे, सासरे सदानंद उणवणे , सासू उषा सदानंद उणवणे असे आरोपींचे नावे आहेत.

सासरच्या मंडळींवर गुन्हा

21 मार्च 2022 पासून वारंवार पीडित विवाहितेला मारहाण करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती अक्षय, सासरे सदानंद, सासू उषा यांनी लग्नानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपासमारीची वेळ आणली. पैशाची मागणी करून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार नगरसेवक पती अक्षय सदानंद उणवणे, सासरे सदानंद उणवणे सासू उषा सदानंद उणवणे यांच्या विरोधात कलम 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान, अक्षय उणवणे हे नगर महानगर पालिकेत बहुजन समाज पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्यासह कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मनपासह शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अमोल आव्हाड अधिक तपास करत आहेत. महिला पोलिस उपनिरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...