आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Beating Of A Transport Officer; Shrirampur City Police Has Registered A Case Against Two Persons And The Accused Have Been Taken Into Police Custody | Marathi News

गून्हेवृत्त:परिवहन अधिकाऱ्यास मारहाण; श्रीरामपूर शहर पोलिसात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले

श्रीरामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन नोंदणी न करताच तत्काळ कागदपत्रांची मागणी करूनही ती दिली नाही म्हणून शिरसगाव येथील दोघांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यास मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोघे मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर आरटीओ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करा, तुम्हाला तत्काळ रजिस्ट्रेशन करतो, असे सांगितले. मात्र, हे दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्या अधिकाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात करून त्यांना मारहाण केली. घटनेची माहिती कळताच सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक बोरसे यांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येऊन गणेश आमले व विजय जाधव यांच्याविरुद्ध शिवीगाळ करून मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...