आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मोर्चाचे स्टेटस ठेवल्याने मारहाण

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बुधवारी झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचा फोटो स्टेटसला का ठेवला, यावरून शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय युवकाला तरूणांनी मारहाण केल्याची घटना भिंगारमध्ये गुरूवारी सकाळी घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या युवकाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन शेख, रेहान, अत्तर, फैजल (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. आलमगीर, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेला युवक भिंगार हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

गुरूवारी सकाळी भिंगार हायस्कूलमध्ये असताना काही विद्यार्थ्यांनी त्याला छेडले. त्याने जाब विचारला असता त्यांनी त्या युवकाला तू बाहेर ये दाखवतो, असा दम दिला. युवकाला शाळेच्या बाहेर आल्यानंतर त्याला तुझ्या मित्राने काल झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचे फोटो स्टेटसला का ठेवला, म्हणून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. परत जर आमचे समजाच्या विरोधात मोबाईलवर काही फोटो किंवा स्टेटस ठेवले, तर तुम्हा एकेकाला जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर त्याचे पडसाद शहरात उमटत आहेत. भिंगारमधील घटनेसह शहरातील एका महाविद्यालयातील युवकाला स्टेटस ठेवल्याच्या मुद्द्यावरून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. मात्र, काहींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भिंगार येथील घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी भिंगार पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...