आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:दशक्रियाविधी घाटाचे सुशोभिकरण; नगरसेवक चव्हाण दाम्पत्याचा उपक्रम

श्रीरामपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरसेवक दीपक चव्हाण व नगरसेविका वैशाली चव्हाण या दाम्पत्याने स्वखर्चाने दशक्रिया विधी घाटाचे सुशोभिकरण केले. तुकाराम महाराजांचे भिंती चित्रे, बसण्यासाठी बेंच, पुर्ण परिसरात वृक्षारोपण तसेच तुकाराम महाराजांच्या डिजिटल प्रतिमेचे उद्घाटन उद्घाटन वारकरी संप्रदायाचे पाईक मच्छिंद्र महाराज खपके व देवरे बाबा यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला सक्षमीकरण आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शुभांगी थोरात यांनी व्यवसाय करताना महिंलासमोरील आव्हाने आणि शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सुप्रिया धुमाळ, अनिता शर्मा आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त दीपाली पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २० कुटूंबातील महिलांच्या नावे मोफत वीज जोडणी देण्यात आली. सूत्रसंचालन चित्रा राणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...