आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी शहरात साईंची हालती प्रतिकृती:शिर्डीत साईभक्तांच्या मदतीतून करणार चौकांचे सुशोभीकरण

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या धर्तीवर शिर्डी शहरात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि दानशुर साईभक्तांच्या मदतीतुन चौकांचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक दत्ता कोते यांनी दिली आहे. तसेच शिर्डी शहरात साईंची हालती प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. शिर्डीच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे, असेही कोते म्हणाले.

कोते म्हणाले, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेकडे शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आपण पाठपुरावा करत आहेत. त्यांनी मदत केली नाही, तर राज ठाकरे यांच्या माध्यमातून शिर्डीला नवा लुक देण्यासाठी मनसे पुढाकार घेणार आहे. स्थानिकांना शहरात मोटरसायकल लावण्यासाठी पार्किंग सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे.आपण यापुर्वी शहरातील कचऱ्याच्या सोयीसाठी भाविकांच्या दानातून ५०० कचराकुंड्या शहरात उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शहरातील महिलांना आठवडा बाजारासाठी मोफत रिक्षाचीही सुविधा अनेक वर्षापासुन सुरू केली आहे. शहराच्या विकासासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे मार्गदर्शन घेवून नियोजनबध्द आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे. साईसंस्थानकडून मोठ्या प्रमानावर निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील असल्याचेही कोते यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...