आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडियाची कल्पना:कार चोरीला गेली म्हणून निवृत्ती वेतनातून उभारला ‘लॉक’ निर्मितीचा कारखाना!

नगर / बंडू पवार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक घर, एक चारचाकी वाहन असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष ते घालतात. मगं कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होते. अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कारखान्यात २९ वर्षे काम करताना एक -एक पैसा जमवून चारचाकी वाहन खरेदी केले आणि ते चोरी गेले. कष्टातून घेतलेले वाहन चोरीला गेल्यानंतर अनेक रात्री न झोपलेल्या एका अभियंत्याने कारखान्याच्या निवृत्तीतून मिळालेले १५ लाख रुपये लावून दुचाकी व चारचाकी चोरी जाऊ नये म्हणून लॉक तयार केले. त्याची प्रयोगशाळेत चाचणी घेतली आणि त्यानंतर कारखाना उभारून त्यात या लॉकचे उत्पादन सुरू केले. या लॉकला आज देशभरातील दिल्ली सह अन्य राज्यातून मागणी सुरू आहे.

नगर एमआयडीसीत खासगी कारखान्यात काम करणारे विलास घोडके यांनी २९ वषार काम करून चारचाकी वाहन खरेदी केली. सावेडीतील अहिल्यानगरी येथे राहणारे घोडके यांनी रात्री घराच्या पार्किंगमध्ये त्यांचे चार चाकी वाहन लावले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्किंगला पाहिल्यानंतर वाहन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाहन चोरीला गेल्याचा त्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली,मात्र वाहन सापडले नाही. वाहन चोरी गेल्यानंतर अनेक रात्री त्यांना झोप आली नाही. आपल्याबरोबरच इतरांचेही वाहन चोरी जाऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार करता करता त्यांना आपण स्वतः असा एखादा सुरक्षित लॉक तयार करायचा, जो वाहन चोरणाऱ्यांपासून बचाव करेल. त्यांनी २०१७ मध्ये निवृत्तीतून जेवढे पैसे होते तेवढे लावून चार चाकी वाहन चोरी जाऊ नये म्हणून लॉक तयार केले. त्याची ट्रायल घेतली. नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीत स्वतःचा ओनम टेक्नॉलॉजी निर्मित फोर स्क्यूर लॉक तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला आहे.

या लॉकला सध्या देशभरातील विविध राज्यांतून मागणी आहे. विशेषतः पुणे पोलिसांना चार चाकीसाठी कमी वजनाचे ५०० लॉक तयार करून देण्यात आले आहे.घोडके यांचे मूळ गाव पारनेर आहे. शासकीय महाविद्यालयातून अभियंत्याचे शिक्षण त्यांनी घेतले.

कारखान्यांत दररोज शंभरावर लॉक तयार होतात
२०१५ मध्ये घरासमोरील पार्किंगमधून वाहन चोरीला गेले. सर्वसामान्यांची वाहन चोरी गेल्यानंतर जशी स्थिती होती तशीच माझी झाली होती. यातूनच एक सुरक्षित लॉक तयार करण्याची कल्पना मला सुचली. त्यासाठी छोट्या छोट्या साहित्याची जमवाजमव केली. निवृत्ती वेतनातून मिळालेले १५ लाख रुपये भाग भांडवल गुंतवून लॉक तयार करण्याचा कारखाना सुरू केला. दररोज कारखान्यांत शंभरहून अधिक लॉक तयार केले जातात. या लॉकचे पेटंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर मी अनेक जणांना हे लॉक दिले. विलास घोडके, संचालक, ओनम टेक्नॉलॉजी.

बातम्या आणखी आहेत...