आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:अधिकारी होत शाळा, गाव, स्वत:चे नाव उज्ज्वल करावे‎

कुकाणे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोठ्या शहरांसारख्या शैक्षणिक‎ सुविधा त्रिमूर्ती संकुलाधीन ग्रामीण‎ मुलांनाही मिळतात. संस्थाचालक‎ पालकांइतकीच काळजी घेत‎ असल्याने या संकुलात शिक्षण घेत‎ असलेल्या विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ‎ अधिकारी होत शाळा, गाव,‎ तालुका व स्वत:चे नाव उज्ज्वल‎ करावे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.‎ गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले‎ त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित‎ त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासे‎ फाटा येथील श्री दादासाहेब‎ हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक‎ व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या‎ बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा‎ शुभेच्छा कार्यक्रम कन्या‎ विभागातील सभागृहात घेण्यात‎ आला.

या कार्यक्रमाला प्रमुख‎ अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.‎ कल्हापुरे व संस्थेचे संस्थापक‎ साहेबराव घाडगे हे उपस्थित होते.‎ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ संस्थेच्या अध्यक्ष अॅड. सुमती‎ घाडगे या होत्या. प्राचार्य कल्हापूरे‎ यांचा संस्थापक साहेबराव घाडगे‎ यांच्या हस्ते सत्कार करुन स्वागत‎ करण्यात आले.

राज्यातील शहरे‎ व खेड्यापाड्यातील मुले येथील‎ वसतीगृहात राहून शिक्षण घेत‎ असल्याने संस्था व विद्यार्थी असे‎ अतूट नाते इथे तयार झालेले दिसत‎ असल्याचे प्राचार्य कल्हापुरे यांनी‎ सांगितले.‎ संस्थेचे संस्थापक साहेबराव‎ घाडगे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ‎ स्वप्न न बघता ती सत्यात‎ उतरवण्याचा निरंतर चंग बांधला‎ पाहिजे. त्यासाठी हे त्रिमूर्ती‎ शैक्षणिक संकुल सदैव पाठीशी‎ आहे. आपले नाव व गावाचे नाव‎ उज्वल करावे, असे आवाहनही‎ त्यांनी केले. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक प्राचार्य सोपान काळे‎ यांनी, सूत्रसंचालन दीप्ती पवार,‎ अमृता ननवरे यांनी, तर आभार‎ बाळासाहेब साबळे यांनी मानले.‎

नेवासे फाट्यावरील त्रिमूर्ती संकुलात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान समारंभात मार्गदर्शन करतांना ज्ञानेश्वर‎ काॅलेजचे प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे छाया : अनिल गर्जे‎

बातम्या आणखी आहेत...