आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोले:अजिंक्य मंडळाच्या शिबिरास सुरुवात

अकोले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन मंडळाने क्रिकेट प्रशिक्षण, बालसंस्कार प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण व बुद्धिबळ अजिंक्यपद या चार शिबिरांचा शुभारंभ अकोला, अशी माहिती अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन मंडळाचे अध्यक्ष विनायक दैवज्ञ यांनी दिली.

अकोले महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे, वकील वसंतराव मनकर, अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर यांच्या हस्ते झाले. अनुभवी क्रिकेट खेळाडू शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार आहेत. मंडळाचे सदस्य नितीन बाणाईत, हेमंत दराडे, अभय विसाळ, नीलेश देशमुख हे मेहनत घेत आहेत. यावेळी बाळासाहेब नाईकवाडी, मुख्य ऊस व्यवस्थापक सयाजीराव पोखरकर, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. बालसंस्कार वर्गाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष वकील के. डी. धुमाळ यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण रुपवते यांचे हस्ते पार पडला. यावेळी आशा बापट यांनी सरस्वती पूजन केले. या शिबिरासाठी डॉ. उमा कुलकर्णी, डॉ. नीरजा कुलकर्णी, स्मिता मुंदडा, सोनल मालवणकर, जयश्री मुंदडा, रेखा धर्माधिकारी, आशा बापट मेहनत घेत आहेत. बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन डॉ. संदीप कडलग यांचे हस्ते झाले. याप्रसंगी विनायक दैवज्ञ, राजेंद्र राठोड, सतीश मालवणकर, नितीन बाणाईत उपस्थित होते. नाट्य शिबिराचे उद्घाटन लक्ष्मण आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...