आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे आयोजन:बेलापूरला गणेशोत्सव निमित्त देखावे स्पर्धा

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापुर बु. ग्रामपंचायतीचा शतकपूर्ती उत्सव तसेच गणेशोत्सवनिमित्त बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी (७ सप्टेंबर) देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापूर बु. ग्रामपंचायत शतक महोत्सव यासह ऐतिहासिक, सामाजिक, पर्यवरण, धार्मिक, व्यसनमुक्ती आदि विषयांवर देखावे सादर करता येतील.

देखावा स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ५००१ रुपये, द्वितीय क्रमांक ३००१ रुपये, तृतीय क्रमांक २००१ रुपये यासह तीन उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.१००१/-याप्रमाणे भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. ज्या मंडळांना सहभागी व्हायचे आहे.त्यांनी आपली नावे मंगळवारपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात सचिन साळुंके यांचेकडे नोंदवावी. देखाव्याचे परिक्षण बेलापूर पत्रकार संघ करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...