आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:कार्यकर्त्यांनो विश्वास ठेवा, संयम बाळगा ; सर्वसामान्य जनता हीच माझी शक्ती

पाथर्डी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला रस्त्यावर उतरवून पदे मिळवण्याएवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. कोणी माझ्या नावाचा वापर करून कुणाचा अपमान तसेच बदनामी केली असेल ते सुध्दा मान्य नाही. विश्वास ठेवा, संयम बाळगा असे आवाहन करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधातील राग शांत करत तुर्त तरी तलवार म्यान केली.

पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीचे दर्शन घेतल्यानंतर मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. भाजपतर्फे पंकजा मुंडे यांचे माळीबाभुळगाव येथे त्यानंतर माजी नगराध्यक्ष आव्हाड यांनी बाबुजी आव्हाड महाविद्यालयाजवळ स्वागत केले.

ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड यांच्या संपर्क कार्यालयाचे व राहुल कारखेले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर शहरातील कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांचे तालुक्यातील विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान समितीच्या सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधल. यावेळी मुंडे म्हणाल्या, कोणत्याही पदावर नसताना पाथर्डीकरांनी केलेल्या भव्य स्वागतामुळे आपण भारावून गेलो आहोत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा घेऊन आपण सक्रिय आहोत. आपला संयम एवढा लेचापेचा नाही. एका कारणाने (विधान परिषद ) एवढी डळमळून जाणार नाही. मात्र, राज्यभरातील लोकांच्या मनात जो संताप भरला तो पुसून टाकून जे बोलायचे ते स्पष्टपणे बोलून कार्यकर्त्यांची क्षमा मागावी, यासाठी एकत्रित भेटलो आहोत.

कार्यकर्त्यांना अडचणीत आणून मला काही मिळवायचे नाही. सत्त्व, तत्व, ममत्व ही माझी तत्वे आहेत. राजकारण म्हणजे युद्धासारखे आहे. जिंकण्यासाठी खेळावे लागले तरी तहाची सुद्धा तयारी ठेवावी लागते. राज्य पुढे अनेक प्रश्न असून शेतकरी विमा वीज बिल वसुली अशा ज्वलंत प्रश्नाबाबत कोणी बोलत नाही. आगामी काळात राज्यात जाऊन या विरुद्ध आवाज उठवून आपण कधी कुणा विरुद्ध शब्द वापरले नाही. वैयक्तिक टीका केली नाही. पातळी सोडून राजकारण सुद्धा केले नाही. सर्वसामान्य जनता हीच माझी शक्ती आहे, असे मुंडे म्हणाल्या. डॉ . ज्ञानेश्वर दराडे यांनी स्वागत केले. विश्वस्त मंडळातर्फ मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...