आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्ययात्रेची मोठी गैरसोय:बेलपिंपळगावमध्ये आता स्वमालकीची शव वाहिनी

सोनई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या बेलपिंपळगावमध्ये आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वमालकीची शववाहिनी तयार करण्यात आली आहे. गावात कुणी स्वर्गवासी झाले तर वाडी वस्ती वरून, पावसात अंत्ययात्रेची मोठी गैरसोय होत होती. हीच अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः वर्गणी गोळा करून गावाला शववाहिनी घेण्याची संकल्पना मांडली व ती प्रत्यक्षात साकारली आहे.

ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ यांनी पुढाकार घेतला. सर्वांनी याला सहमती देत हातभार लावला. ४ लाख रुपयांचा खर्च शववाहिनी गावात दाखल झाली. आठ दिवसात ती गावासाठी वापरात येणार असून शेजारील गावात जरी अडचण आली तरी सहकार्य केले जाईल. तसेच ग्रामपंचायतने सांगितले आहे की ही शव वाहिनी गावाला निशुल्क भेटेल. तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असेल की जिच्याकडे निशुल्क शववाहिनी आहे.

पुढील महिन्यात गावातील पोलिस दलातील कर्मचारी व काही सरकारी कर्मचारी हेही आपण गावचे काही देणे लागतो, या हेतूने ग्रामपंचायतला रुग्णवाहिका भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील अनेक अडचणी दूर होणार आहेत. गावातील सर्वच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे कौतुक करत आहेत. या शववाहिनीचे गावात मंदिरासमोर पूजन करून ती गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील बबनराव वरघुडे, रवींद्र शेरकर, अमोल कोकणे, कृष्णा शिंदे, बाबासाहेब रोटे, सूर्यभान मेहेत्रे, अशोक शिंदे, वसंत शेरकर, वसंत कांगुणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...