आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपरगाव शहर:कोल्हे कारखान्यास ‘बेस्ट इनोव्हेटिव्हशुगर प्लॅन्ट’ पारितोषक : कोल्हे

कोपरगाव शहर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने देशपातळीवर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नावलौकीक प्राप्त केला आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेने कोल्हे कारखान्याची चालू वर्षासाठी ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट’ या पारितोषकासाठी निवड केल्याची माहिती सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. हे पारितोषिक म्हणजे स्व. शंकरराव कोल्हे यांचा विचारांचा वारसा आणि सर्व ज्ञात-अज्ञात ऊस ऊत्पादक सभासद, शेतकरी, कष्टकरी, कारखाना व्यवस्थापन, कामगार, हितचिंतक, शेतमजुर, व्यापारी आदिंचे अनमोल सहकार्याचा परिपाक असल्याचेही ते म्हणाले.

कोल्हे म्हणाले,कोल्हे कारखान्याने आजवर राज्य व देशपातळीवर विविध २१ पारितोषके मिळविली आहेत. भारतीय शुगरच्या राष्ट्रीय पारितोषिकामुळे कोल्हे कारखान्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या पारितोषकाची निवड देशातील सहकारी साखर कारखानदारी मधुन केली जाते. सन २०२२ या वर्षाकरिता भारतीय शुगरच्या टीमने संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्याचा अभ्यास करून सहकारी तत्त्वावरील ‘इनोव्हेटीव्ह प्लॅन्ट’ म्हणून सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याची निवड केली आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...