आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची कौतुकास्पद कामगिरी:माझी वसुंधरा अभियानात नगर महापालिकेची राज्यात सर्वोत्तम कामगिरी; रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत सिटी गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये नगर महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. रविवारी (5 जून उद्या) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान सोहळ्यात अहमदनगर महापालिकेला गौरवण्यात येणार आहे.

महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर महापालिकेने पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी ऊर्जा बचत करणारे पथदिवे, सौर ऊर्जा प्रकल्प, वृक्षगणना, पुरातन प्राचीन वृक्ष जतन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, उद्यान निर्मिती, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, भिंतीचे रंगकाम, सुशोभिकरण, इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देणे, चार्जिंगची व्यवस्था करणे या योजनांवर प्रभावी काम केले. त्याची दखल घेत नगर महापालिकेचा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये समावेश झाला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह माझी वसुंधरा अभियानात काम केलेल्या 4 पदाधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदी उपस्थित या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...