आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:64 वर्षीय भागवत यांनी 111 वेळा केले रक्तदान; वयाच्या 26 व्या वर्षी झाला होता रक्तदान चळवळीचा श्रीगणेशा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्राचा जीव वाचवण्यासाठी १९८४ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी जयंत भागवत यांनी पहिले रक्तदान केले होते, त्यानंतर रक्तदान करण्याची सवय लागून गेली. सोमवारी त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी १११ वेळा रक्तदान केले. रक्तदानाची शंभरी ओलांडणाऱ्या मोजक्या रक्तदात्यांपैकी भागवत एक असावेत. सोमवारी जनकल्याण रक्तपेढीत त्यांनी १११ वे रक्तदान केले. त्यांना रक्तदानाची प्रेरणा त्यांच्या मित्राच्या अपघातामुळे मिळाली. अपघातात जखमी झालेल्या मित्रावर तातडीने एक शस्त्रक्रिया करायची होती. शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मोठी गरज होती. त्या काळात (१९८४) रक्तदान करायला लोक घाबरत होते, पण मित्रासाठी भागवत यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या रक्तदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. आणि वर्षातून चार वेळा रक्तदान हा कार्यक्रम नंतर ठरूनच गेला. असे करत भागवत यांनी गेल्या ३८ वर्षांत त्यांनी १११ वेळा रक्तदान केले.

रक्तदानातूनच पूर्ण होते रक्ताची गरज
मानवी रक्ताला अद्याप तरी कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे रक्तदानातूनच रक्ताची गरज पूर्ण होते. त्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. वयाच्या १८ ते ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून एक ते दोन वेळा रक्तदान करावे. तरुणांनी वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान केल्यास रक्ताची कमतरता भासणार नाही.''
जयंत भागवत, रक्तदाते.

बातम्या आणखी आहेत...